पिंपरी चिंचवड भाजपचे विद्यमान आमदारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर चिंचवड येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. विद्यमान आमदार अनेक लोकांच्या संपर्कात आलेले असल्याने खळबळ उडाली आहे.
आमदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सर्वत्र मदत पोचविण्याचे काम करत होते. त्यामुळे हायरिस्क वातावरणात सामाजिक बांधिलकीपोटी त्यांचा मतदारसंघातील लोकांशी संपर्क आला होता.
तसेच शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक पार पडली होती त्या बैठकीला आमदार उपस्थित असल्याने अनेक बड्या अधिकारी राजकीय नेत्यांच्या संपर्कात ते आले होते.
मागील आठवड्यात विधासभेचे विरोधी पक्षनेते यांच्या पिंपरी येथील दौऱयावेळी ते त्यांच्या सोबत होते. दरम्यान त्यांचा लोकांशी मोठ्या प्रमाणावर संपर्क आल्याने त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली असल्याची माहिती समोर आलेली आहे.




















































