पुणे प्रतिनिधी; ग्लोबल पीस फाऊंडेशन ,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना भारतीय महा क्रांती सेनेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या”स्टार आयकॉन इंडिया”हा यावर्षीचा पुरस्कार नुकताच पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना देण्यात आला.
सदर पुरस्काराचा कार्यक्रम हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात घेण्यात आला. सध्या जगभर सुरु असलेल्या करोना महामारीच्या मुळे सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम पोलीस आयुक्तालयात पुरस्कार वितरित करण्यात आला. भारतीय महा क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे यांच्या हस्ते माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना देण्यात आला. सदर कार्यक्रमाप्रसंगी भारतीय महा क्रांती सेनेचे निवडक पदाधिकारी पराग डिंगणकर, आजय जाधव, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महा क्रांती सेनेचे वकील आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जाधव पाटील यांनी केले.





















































