नवी दिल्लीः भारतात एका दिवसात कोविड -१९ चे १६५७७ नवीन नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर देशात संसर्ग झालेल्यांची संख्या १,१०,६३,४९१ झाली आहे. यापैकी १,०७,५०,६८० लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे शुक्रवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, मागच्या २४ तासांत संक्रमणामुळे आणखी १२० लोकांचा मृत्यू झाला आणि मृतांचा आकडा १,५६, ८२५ पर्यंत वाढला आहे. आकडेवारीनुसार, केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये व्हायरसमुळे मृत्यूची पहिली घटना घडली आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत विषाणूमुळे मृत्यू झालेल्या १२० लोकांपैकी ५६ महाराष्ट्रातील, केरळमधील १४ आणि पंजाबमधील १३ आहेत.
देशात उपचार घेणाऱ्या लोकांची संख्याही वाढून १,५५,९८६ वर पोहोचली, जी एकूण प्रकरणांपैकी १.४१ टक्के आहे. आकडेवारीनुसार, एकूण १,०७,५०,६८० लोक संसर्गमुक्त झाल्याने, देशातील रूग्णांचे पुनर्प्राप्तीचे प्रमाण ९७.१७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कोविड -१९ मुळे मृत्यूचे प्रमाण १.४२ टक्के आहे. देशात, संक्रमित लोकांची संख्या मागील वर्षी ७ ऑगस्टला २० लाखांवर, २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ४० लाखांवर पोहोचली होती.
त्याचबरोबर १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख, ११ ऑक्टोबरला ७० लाख, २९ ऑक्टोबरला ८० लाख आणि २० नोव्हेंबरला ९० लाख आणि १९ डिसेंबरला एक कोटी संसर्ग झाल्याची घटना घडली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नुसार २५ फेब्रुवारीपर्यंत देशात कोविड -१९ च्या २१,४६,६१,४६५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
त्यापैकी ८,३१,८०७ नमुन्यांची गुरुवारी तपासणी करण्यात आली. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण १,५६,८२५ लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे, त्यापैकी महाराष्ट्रातील ५१,९९३ तामिळनाडूमध्ये १२,४८३, कर्नाटकमध्ये १२,३१६, दिल्लीत १०,९०५, पश्चिम बंगालमध्ये १०,२६०, उत्तर प्रदेशमध्ये ८,७२३ आणि आंध्र प्रदेशातील ७,१६८ लोक आहेत.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७० टक्के लोकांना इतर आजार आहेत. मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, त्याचा डेटा आयसीएमआर डेटाशी जुळविला जात आहे.