पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी मुळे एल इ डी दिवे बसवन्यात आले आहे पण बोपखेल रामनगर गणेशनगर मधिल काही भागात अजूनही जुनेच पथदिवे दिसत आहे. पथदिवे कधी ही बंद पडतात आणि मध्येच चुरचुर आवाज करत असतात अशा मुळे भिंतीचे वातावरण निर्माण होते.
त्यामुळे आमच्या प्रभागातील गल्लीबोळ कॉलनी अंतर्गत रस्ते वरील जुने पथदिवे काढुन नविन एल इ डी दिवे बसवन्यात यावे, असा अर्ज आज मा. आयुक्त पाटिल साहेब यांना देण्यात आला त्या वेळी भाग्यदेव एकनाथ घुले, रोहिदास जोशी, दिलीप घुले, दत्तात्रय घुले, दत्ता घुले, नंदु घुले, नामदेव गोळे, मारुती मोरे, अशोक वहिले इत्यादी उपस्थित होते.