पुणे : ससून रुग्णालयाच्या 8 व्या मजल्यावरून मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या दीप्ती काळे या महिला आरोपीने उडी मारून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मात्र ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पडली असावी असाही अंदाज पोलीस वर्तविला आहे.
दीप्ती सरोज काळे असे मृत्यू झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांच्यावर सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ती पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तर कालच तिच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 46 गुंठे जागा नावावर करून घेत आणखी 56 गुंठे जागा द्यावी यासाठी धमकावत असे अशी तक्रार आली होती.





















































