चिंचवड:प्रतिनिधी, (ppcnews.in)
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजणार आहे. पिंपरी चिंचवड मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. पक्षाच्या पातळीवर याकरता देखील प्रयत्न सुरू आहेत. पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज करण्यास प्रारंभ झाला आहे.पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी पक्षाच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात ७०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पक्षात प्रचंड प्रमाणात झालेल्या इनकमिंग मुळे इच्छुकांची पसंती अर्थात भारतीय जनता पार्टीला आहे. पण याच धर्तीवर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता बळवली असून त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे , रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी यांनी स्वतः दखल घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील उमेदवारी संदर्भात निर्णय घ्यावा. अशी मागणी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
उमेदवारी मिळावी म्हणून शहरातील ६५०/७०० कार्यकर्ते व नेते पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इतक्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्यामुळे शहरातील भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ता नाराज झाला आहे . पक्षाला पडत्या काळात अनेक वर्षांपासून निष्ठावान कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षांचे काम करून पक्ष वाढी करता काम केले आहे. आणि आज जेव्हा पक्षाला सुगीचे दिवस आले असताना निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होऊ शकतो. निवडणूक आली की आयाराम गयारामांना निवडणुकीत तिकीट देण्यात येते. पक्षाच्या वाईट काळामध्ये सतरंगी उचलण्यापासून पक्ष वाढीसाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून आयाराम गयारामांना उमेदवारी देण्यात येते. जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्यामुळे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता निराश झाला आहे.
येत्या निवडणुकीत निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात यावी. पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा पक्ष कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी. असा इशारा निष्ठावंत कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला. यामुळे भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर मिळाला आहे.
ज्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील पक्ष संघटना वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम केले. त्या कार्यकर्त्यांना वरीष्ठ नेते आमदार, खासदार ऐनवेळी डावलून आयाराम गयाराम ह्यांना निवडणुकीत उमेदवारी देतात . याकरता पक्ष संघटना वाढी सारखी बेगडी कारण देऊन त्यांना गप्प केले जाते.या कामी आर्थिक देवाण घेवाण होण्याची देखील व्यक्त केली आहे.साम दाम दंड भेद नीती वापरून इच्छुक तिकीट मिळवण्यासाठी पायपीट करत आहे. यामुळे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐनवेळी पक्ष नेतृत्व कडून तिकीट वाटपात पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब ह्यांना ईमेल आयडी वर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी चे निष्ठावंत कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे.





















































