साधी राहणी उच्च विचारसरणी…!!
भारतातील १३ भाषांत ज्यांनी काम केले आहे असे बॉलीवूड
व मराठी सिनेजगतामधील जेष्ठ-श्रेष्ठ अभिनेते, अतिशय नम्र आणि
साधी राहणी, उच्च विचारसरणी हे आयुष्याचे प्रतिक मानणारे आणि
प्रत्येक माणसाशी जमिनीवर राहून बोलणारे बाॅलिवूड अभिनेते ‘जॅकी श्रॉफ’
यांच्याशी पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकार संघात पी पी सी न्यूज लाईव्हच्या पत्रकार तन्मयी मेहेंदळे यांनी साधलेला मुलाखतपर
संवाद.
. नऊ भाषांमधील सिनेमात तुम्ही अभिनय केलाय तो अनुभव कसा होता?
नऊ नाही तेरा भाषांमध्ये मी काम केलयं आणि अनुभव म्हणजे मला काही
टेन्शन नाही. ज्यांनी मला घेतलं त्यांना टेन्शन आहे हेच खरे, पण काम चोख
पाहिजे इतकच मला वाटते.
. टायगर श्रॉफ हा युथ आयकॉन बनलाय त्याला तुम्ही काय खास ट्रेनिंग
दिलंय डान्ससाठी?
– मी आणि डान्ससाठी.. वा वा.. मी डान्स.. नारंगी मोसंबी, गोरिया रे गोरिया,
झलक झलक, इतक्याच गाण्यांवर केले. जास्त नाही केले. टायगर स्वतः
मेहेनतीने डान्स आणि अभिनय उत्तम करतो. माझे असे काही मार्गदर्शन नाही.
फक्त हेच आहे की, माझा टायगर खुदका पॅक्टीस जिम्नॅस्टिक, फाईट डान्स
स्वतः मेहेनतीने करतो. मला आईने सांगितले की, मोठ्या लोकांना मान
द्यायचा.. बस्.. मी तेच करतो.
• महाभारतात दुर्योधनाला तुम्ही आवाज दिलाय तो अनुभव कसा होता?
अनुभव हर चीज करनेका अच्छाही होता है…अनुभव खराब भी था.. भाई
गया उसको देखा मरते हुए, अनुभव चांगला होता आणि खराब पण होता मतलब
मालूम पड़ा कि लाईफ क्या है. पहिला पिक्चर सॉलिड सक्सेसफूल हो गया.दुसरा हुवा, तिसरा फेल हो गया. मालूम पडा कि लाईफ क्या है.. अनुभव हो गया
कि भाई दो कदम आगे एक कदम पिछे, अपनी जमीन पकडके चलनेका !! फिर
अनुभव हुवा, समझा की अपने आपको ज्यादा श्याना नहीं समझना.मी आहे, मी
आहे, अरे काय.. मी.. मी…जे आहे ते सगळं आत्ता. बाद में, मी मुंबईला जाणार,
मी आलाम लावणार, मी मिसळपाव खाणार, वडापाव खाणार, ये सब सपना है
भाऊ… जो कुछ है वो अभी है … भिडू..!
• आणि तुम्ही शाकाहारी आहात तर तुमच्या जेवणाच्या आवडी निवडीबद्दल
काय सांगाल?
– पालक मेतकुट भात, वरण भात तूप, नाचणीची भाकरी, आमटी, डाळ पिठलं
भात, पिठलं भाकरी सब कुछ.
• अनेक चित्रपटात तुम्ही खलनायक केलात त्याबद्दल काय सांगाल?
– हर इन्सान के अंदर एक खलनायक होता है भिडू… पण आपले आयुष्य
आपण जगायचं असतं ते सकारात्मकतेनी जगायचं इतकाच.. नायक खलनायक
चालूच राहणार…
• फ्री टाईममध्ये काय करता ?
मी तळेगावला माझं फार्म हाऊस आहे. मी माझ्या फ्री टाईममध्ये जातो आणि
झाडे लावली आहेत त्यांचे संगोपन करतो. स्वच्छ आणि टापटीप जगण्यासाठी
मला वृक्षमित्रता खूप महत्वाची वाटते.
पुण्यातील ‘शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवा’ची संयोजन समिती
म्हणून काय सांगावेसे वाटते ?
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. विविध प्रकारच्या नृत्य
महोत्सव
शिकवणाऱ्या सांस्कृतिक संस्था पुण्यात आहेत. मात्र त्यांच्या करिता स्वतंत्र नृत्य
पुण्यात नव्हता. शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव गेली १८ वर्षे
असून, पुण्याचे भूषण बनला आहे. मुंबईतही असा महोत्सव व्हावा.
शब्दांकन – तन्मयी नचिकेत मेहेंदळे ,पुणे