बाबासाहेब पुरंदरे, (पद्मविभूषण शिवशाहीर)
शिवशाहीराला मानाचा मुजरा….!!
महाराष्ट्रातील एक मोठे व्यक्तिमत्व आणि तरुणाईसाठी
आदर्शवत असलेले आणि दैवत मानलेले बाबासाहेब पुरंदरे-
त्यांच्याशी केलेली शिवमय बातचीत …
• जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन काय राहील ?
– सकस आहे. कोणत्याही गोष्टीकडे मी सकारात्मकतेने पाहतो. नाटकी, रागावून,
चिडून बोलणे मला अजिबात जमत नाही.
• छत्रपती शिवरायांच्या प्रेमाची सुरुवात कशी आणि आकर्षण केव्हापासून
सुरु झालं? त्यासाठी तरुण वयात तुम्ही त्यासाठी काय काय केले ?
शिवराय हा सगळ्यांचा स्थायीभाव असला पाहिजे. आजही आमची मुले किल्ले
बनवतात, मातीत खेळतात. महाराष्ट्राची शिवराय, भवानीमाता, हनुमान ही दैवते
आहेत. तरुणवयातील खूप आठवणी आहेत. खूप किल्ल्यांत फिरलो त्यांच्या
खूप आठवणी आहेत. काही आनंदाच्या काही दुःखाच्या. पण काही किल्ल्यांत
निसर्गाचं रूप बघून रममाण व्हावं अशा अनेक आठवणी आहेत.
• गड किल्ल्यांच्या किती भ्रमंती केल्या, साथीला कोण कोण असायचे ?
आता माझे वय आहे ९७, मी माझी पहिली ट्रीप केली तेव्हा मी ८ वर्षाचा होतो.
या इतक्या वर्षांच्या भ्रमंतीत अनेक लोकं सोबत होते. पहिला किल्ला मी सिंहगड
केला. खूप खूप आनंद झाला होता.
• शिवशाहीर ही पदवी केव्हा मिळाली त्या विषयी काय सांगाल ?
-कौतुकाने लोकांनी दिली. मला आवड आहे पण बाकी लोकांनी ठरवायचे, पण
मला गाता येत नाही त्यामुळे शाहीरपेक्षा लोकांनी सेवक, कवी, लेखक म्हणलेलं
जास्त आवडेल.
•जाणता राजा विषयी काय सांगाल ?
– जाणता राजाचे १५५० प्रयोग आतापर्यंत झाले. ज्या-ज्या ठिकाणी दौरे
असायचे त्याची तालीम तिकडे व्हायची-बेळगाव, कोल्हापूर वगैरे ठिकाणची.
• महाराष्ट्रभूषण मिळाला तेव्हांची भावना काय होती ?
मी मागितलेला नाही गं, अतिशय प्रेमाने लोकांनी दिलं. लोकांच प्रेम हेच
महत्वाचे आहे. त्याचा आदर करणे हा माझा स्वाभाविकच स्वभाव आहे. त्याच्या
पोटी जे काही सरकारी फायदे असतात त्यातील मी एकही घेतलेला नाही आणि
घेणारही नाही.
आवडते लेखक कोण आहेत ?
हरी नारायण आपटे, पु. ल. देशपांडे आणि ग.दि. माडगुळकर.
• तुमच आवडतं पुस्तक ?
शिवाजी महाराजांच्या सहवासात लिहिलेलं शिवभारतफ हे पुस्तक कवीन्नर
परमानंद नेवासकर या नावाच्या एका पंडितांनी लिहिल आहे. तो महाराजांच्या
काळात होता. तो आय विटनेस आहे त्याकाळचा म्हणून मला हे पुस्तक आवडते.
• तुमचा आवडता किल्ला ?
महाराष्ट्रात सुमारे लहान मोठे किल्ले, कड्या-कपारी सुमारे ३५० आहेत. मला
सिंहगड आवडतो.
• उत्तम प्रकृती कशी राखलीत ?
– मला कसलेही व्यसन नाही त्यामुळे ही प्रकृती राखली. मी अतिशय नियमित
आणि ठरल्याप्रमाणे वागतो त्यामुळे ठीक आहे.
पद्मविभूषण हे २६ जानेवारी २०१९ ला प्रदान केले या विषयी काय सांगाल ?
– आदर आहे ! खूप छान वाटले, आनंद झाला, आणि शासनाचा आदर करणे
गरजेचं, कारण स्वराज्य आपलं आहे. पूर्वी इंग्रजांच्या काळात रावबहादूर वगैरे
सारख्या पदव्या त्यांच्या कामाकरिता दिल्या जायच्या परंतु आमच्या शासनाने
आमचे काम बघून आम्हाला पद्म दिले हे खूप आनंददायी आहे.
शब्दांकन – तन्मयी मेहेंदळे(उपसंपादिका पीपीसी न्यूज लाइव्ह,पुणे)