पुणे : वडगावशेरीतील सर्व्हे नं. ५५, साईनाथ नगर येथील डीपी रस्त्याचे काम गेल्या १० वर्षांपासून रखडलेले आहे. तसेच रहदारीचा मुख्य रस्ता बंद केल्याने येथील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे. या मागणीसाठी या रस्त्यावर असलेल्या चार सोसाट्यांमधील सुमारे ४०० ते ५०० नागरिकांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
यावेळी सुरेंद्र पठारे फाऊंडेशचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे, नवनाथ फराटे, उमेश जयस्वाल कुमार प्राईमवेरा सोसायटी, करणरेहा सोसायटी, कुमार परिषद सोसायटी करण सोसायटी आणि एथिना सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोसायटीच्या परिसरातून खराडी-शिवणे रस्ता जातो. याला जोडणारा डीपी रस्ता महापालिकेने मंजूर केला आहे. मात्र गेल्या १० ते १२ वर्षांपासून रस्त्याचे काम अर्धवट आहे. तसेच मुख्य साईनाथ नगर मधून जुना मुंढवा रस्त्याकडून सोसायटीला जोडणारा रस्ता बांधकाम व्यावसायिक आणि पूर्वीचे खाजगी जागा मालक यांच्यांत वाद सुरू असल्याने पत्रे मारून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या चार सोसायट्यांमध्ये सुमारे १५०० सदनिका असून १३०० चार चाकी २५०० दुचाकींची रहदारी आहे. त्यामुळे त्वरित हा रस्ता खुला करण्यात यावा तसेच डीपी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे. अशी मागणी करून काम पूर्ण झाले नाही तर धरणे आंदोलन जाईल. असा इशारा येथील नागरिकांनी दिला.
महिलांचा संताव अनावर
महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. भाजी मंडई मध्ये जाता येत नाही. रहदारीचा रस्ता खोदल्याने महिलांना त्रास होत आहे.
अर्धवट रस्त्यावर काही दारुड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्लक्षित भाग असून झाडे झुडपे वाढलेली आहेत. दारुड्या व्यक्तींचा त्रास सहन करावा लागतो. अशी संताप जनक प्रतिक्रिया पुष्पा झागींड, सपना गुप्ता, जेमेनी राठोड आदी महिलांनी व्यक्त केली.
एका इमारती मध्ये आग लागली होती त्यावेळी अग्निशमन दलाच्या गाडीला आत येता आले नाही. एवढा छोटा रस्ता येथे आहे. डीपी रस्ता म्हणून मंजूर करण्यात आला आहे. डीपी रस्ता दाखवून सोसायटीच्या फ्लॅट विकले गेले . मात्र गेल्या १० वर्षापासून रस्ता तयार करण्यात आलाच नाही.
नवनाथ फराटे, सचिव कुमार प्राईमवेरा सोसायटी.
येथील सोसायटीतल्या रहिवाशांचा प्रश्न बिकट झाला आहे. महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे. खराब स्ता आणि इतर अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. तात्काळ हे प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून सोडवण्याची मागणी केली आहे. येत्या १० ,दिवसात रस्ता मोकळा केला जाईल.
– सुरेंद्र पठारे , अध्यक्ष सुरेंद्र पठारे फाऊंडेशन
कोट
रस्ता ज्या दिवशी बंद करण्यात आला. त्यादिवशीच पाहणी केली. त्यानंतर महापालिकेला पत्रव्यवहार केला. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली आहे. बांधकाम व्यवसायिक आणि पूर्वीचे खाजगी जागा मालक यांच्यांत वाद सुरू आहे. रस्ता येत्या १० ते १५ सुरू करू असे विभागाने सांगितले आहे.
– संदीप जऱ्हाड, नगरसेवक.