पुणे: कोरोना विषाणूच्या संकटामुळे बंद पडलेले उद्योगजगत हळूहळू सुरु होऊ लागलेले आहे. या आर्थिक अडचणीत सापडलेल्या उद्योगक्षेत्राला केंद्रसरकारच्या अप्रेन्टिस योजेनेच्या अंमलबजावणीमुळे निश्चितच लाभ होऊ शकतो, यादृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांसाठी येत्या २९ मे रोजी शुक्रवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या पुणे विभागाच्यावतीने अप्रेन्टिस योजनेची सविस्तर माहिती व्हावी यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये अप्रेन्टिस योजनेचे वरिष्ठ सल्लागार प्रमुख श्री.सुरजित रॉय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विश्वेश कुलकर्णी व व्हॉलव्हो आयशर कमर्शिअल व्हेईकल्स लि.च्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष श्री. सुदीप देव या तीन मान्यवरांचा परिसंवाद होईल.
उद्योगजगाच्यादृष्टीने अप्रेन्टिस कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते याविषयी या परिसंवादात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या मोफत वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://bit.ly/2Zy67lt या लिंकवर इच्छुकांनी नावनोंदणी करावी किंवा सुनील नेवसे यांच्याशी 9527128300 या मोबाईलवर
संपर्क साधावा.तसेच अधिक माहितीसाठी संपर्क
योगेश रांगणेकर 7350014536 / 9325509870 यांच्याशी संपर्क करावा.





















































