पिपीसी न्यूज प्रतिनिधी:
फोकलोर ॲन्ड कल्चरल हेरिटेज फाउंडेशन पुणे यांच्यावतीने एक दिवसीय वसंतोत्सवाचे आयोजन श्रमिक पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. वसंतोत्सवाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. वसंतोत्सवाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वसंतोत्सवाची उत्सवाची सुरुवात अत्यंत आनंददायक वातावरणात झाली. सर्वात प्रथम आधी चैत्र गौरी म्हणजे चैत्रांगणाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. जितेंद्र पानपाटील, प्रवीण भोळे, शैला खांडगे आणि फाउंडेशनच्या संचालक डॉ. सुनीता धर्मराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी वसंतोत्सवच्या कार्यक्रमाबद्दलची भूमिका आणि प्रास्ताविक डॉ. सुनीता धर्मराज यांनी केले.
या प्रसंगी मृणालिनी खंदारे, लोकसाहित्य अभ्यासक व उद्योजिका प्रा. शैला खांडगे, प्राचार्य, कृषी तज्ञ, पटकथालेखक, डॉ. सुवर्णा बिभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. सुखदा खांडगे यांनी कथ्थक केले, गौरी वनारसे व निकिता बहिरट यांच्या संबळ वादन करून देवीचा जागरण करण्यात आले. त्याच बरोबर स्त्रियांचे पारंपारिक खेळ, फुगडी, भोंडला, मंगळागौरी या पारंपरिक लोककलेला अश्विनी छत्रपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केल्या. रेश्मा परितेकर यांनी बहारदार लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर विविध माध्यमातील स्त्रियांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये भाग्यश्री देसाई, नीलिमा पटवर्धन, संध्या पुजारी, ममता सपकाळ यांना सन्मानित करण्यात आले. फोकलोर ऍण्ड कल्चरल हेरिटेज फाउंडेशनच्या संचालक डॉ. सुनीता धर्मराव म्हणाल्या की महाराष्ट्राला खूप मोठा पारंपरिक लोककलेचा वारसा लाभला आहे. हा वारशाचे आम्ही जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मयी जोशी यांनी केले.
*माती, नीती आणि संस्कृतीचा हात सुटता कामा नये – ममता सिंधुताई सकपाळ*
वसंतोत्सवात पारंपरिक लोककलेला उजाळा मिळाला याचा मला मनसोक्त आनंद आहे. फोकलोर ऍण्ड कल्चरल हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने पारंपरिक लोककलेला उजाळा मिळत आहे. आपल्या माती, नीती आणि संस्कृतीचा हात सुटता कामा नये असे मला वाटते.
ती नाळ कायम जपली पाहिजे.