*पुणे : दिनांक २६ जुलै २०२०* : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या पुढाकाराने पत्रकार बांधवांसाठी ऑनलाईन वेबसाईट डिझाईन कोर्सचे १५ जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले. कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुण्यातील यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला तसेच यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचेही सहकार्य लाभले.
दहा दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आज रविवारी २६ जुलैला या प्रशिक्षणाचा समारोप झाला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे दोन प्रशिक्षणार्थींनी स्वतः वेबसाईट बनविण्याचा केलेला प्रयत्नही यशस्वी झाला.
प्रशिक्षणाच्या समारोप सत्रात मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डाॕ. उज्वला बर्वे यांनी सांगितले की, वेब डिझाईन हा समजायला अवघड असलेला विषय डाॕ.सुनिता पाटील यांनी तळमळीने शिकवल्यामुळेच प्रशिक्षणार्थांनाही आवड निर्माण झाली.
पत्रकारबांधव व त्यांच्या कुटुंबियांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वेबसाईट डिझाईनचे कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी नमूद केले.
तर प्रशिक्षण संपले असले तरीही आपण विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध असु अशी ग्वाही डाॕ.सुनिता पाटील यांनी दिली.
दहा दिवस चाललेल्या या उपक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी तीस जणांनी सहभाग घेतला.
यशस्वी संस्थेच्या शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.सुनिता पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहीले.तर प्रा.वैशाली भुसारी यांनी सहकार्य केले असून तांत्रिक बाबींसाठी पत्रकार संघाचे सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे यांनीही मोलाचे सहकार्य केले. पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल जगताप यांनी सर्वांचे आभार व्यक्त करीत प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप झाल्याचे जाहीर केले.
अधिकी माहितीसाठी संपर्क
योगेश रांगणेकर
मोबा : 7350014536 / 9325509870





















































