पिंपरी : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घंटानाद, शंखनाद आणि महाआरती अशी आंदोलने करण्यात आली. अखेर राज्य सरकारला धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने आनंदोत्सव आणि ठिकठिकाणी महाआरती सोहळा आयोजित करण्यात आला.
– शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ते चिंचवडमधील श्रीमान महासाधू मोरया गोसावी मंदिरापर्यंत सर्व ग्रामदैवतांच्या मंदिरांसह सर्वधर्मिय प्रार्थनास्थळांमध्ये सोमवारी भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
– आनंदोत्सवा महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती
यावेळी महापौर माई ढोरे, महिला प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, प्रदेश सरचिटणीस अमित गोरखे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विजय फुगे, राजू दुर्गे, माजी महापौर नितीन काळजे, राहूल जाधव, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका मोनाताई कुलकर्णी, करुणा चिंचवडे, संगीता भोंडवे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, प्रभाग स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, विनोद तापकीर, विठ्ठल भोईर, संदिप गाडे, संदिप नखाते,
युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चौंधे, प्रदेश युवा उपाध्यक्ष अनुप मोरे,महीला अध्यक्ष उज्वला गावडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, प्रमोद ताम्हणकर, चिंचवड-किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, शहर उपाध्यक्ष काळूराम बारणे, धनंजय शाळीग्राम, विनोद मालू, संजय पटनी, सुरेश पाटील, हरीभाऊ चिंचवडे, दिपक गावडे, नारायण लांडगे, पांडूरंग चिंचवडे, देवदत्त लांडे, मिथुन बोरगांव, राहुल मोकाशी, स्वप्निल भोईर, राजू लांडगे यांच्यासह कुंदा भिसे, पल्लवी वाल्हेकर, दिपाली धानोकर, रेखा कडाली, सुमन जांभूळकर, रंजना चिंचवडे, प्रतीभा चिंचवडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ‘महाआरती व आनंदोत्सवात’ सहभागी झाले होते





















































