हिंदुस्तान पेट्रोलियमचा पुढाकार
संपूर्ण भारतभरातुन १,२९,२८८ विद्यार्थी सहभागी
पुणे:
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आयोजित देशव्यापी ‘एचपी पॉवर लॅब – विकसित भारतासाठी संकल्पना’ या उपक्रमात संपूर्ण भारतभरातुन १,२९,२८८ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या अनोख्या उपक्रमाचा उद्देश नवोन्मेषाला चालना देणे आणि भारताच्या विकासविषयक दृष्टिकोनास हातभार लावणे हा होता.देशभरातील आयआयटी, एनआयटी आणि आयआयएम सारख्या नामांकित संस्थांसह ७ हजारहून अधिक शैक्षणिक संस्थांचा समावेश होता.एचपीसीएलचे शुद्धीकरण विभागचे संचालक एस. भरतन आणि मानव संसाधन विभागाचे संचालक के. एस. शेट्टी, तसेच इतर मान्यवर आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.दि.२६ फेब्रुवारी २०२५ रोजी हा कार्यक्रम सिम्बायोसिस(लवळे) येथे झाला.विद्यार्थ्यांनी या नाविन्यपूर्ण स्पर्धेत भाग घेतला.ऊर्जा, समानता आणि समावेशन, ग्रामीण भारतासाठी ऊर्जा, हरित ऊर्जा, टिकाऊपणा आणि तांत्रिक नवकल्पना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी विचार मांडले.
अंतिम फेरी(ग्रँड फायनल)मध्ये एनआयटी दुर्गापूर संघाने ‘पॉवरपॉड्स: सौर ऊर्जा उपायांसह परवडणाऱ्या इंधन प्रवेशाचा विस्तार’ या संकल्पनेसाठी अखिल भारतीय विजेतेपद पटकावले. आयआयटी मद्रासने ‘एचपीसीएलच्या शुद्धीकरण, प्रक्रिया आणि वितरण प्रणालींमध्ये ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्याचे नेक्स्ट-जेन सोल्यूशन्स’ या संकल्पनेसाठी द्वितीय क्रमांक पटकावला. दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम कॉलेजला ‘ऊर्जा समानता आणि समावेशन’ या संकल्पनेसाठी तृतीय क्रमांक मिळाला.पाच महिन्यांच्या विस्तृत मूल्यमापन प्रक्रियेनंतर, १५१ विद्यार्थ्यांचे ४८ संघ अंतिम फेरीसाठी पुण्यात निवडले गेले. या संघांना एचपीसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यवर परीक्षक मंडळासमोर त्यांचे विचार सादर करण्याची संधी मिळाली. ग्रँड फायनलमध्ये १५ संघ अंतिम फेरीत पोहोचले आणि त्यांनी आपल्या संकल्पना ग्रँड ज्युरीसमोर मांडल्या.
एचपी पॉवर लॅब – ‘विकसित भारत २०४७’ साठी एक पाऊल
हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेस पूरक आहे. नागरिक, संस्था आणि उद्योगांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि भारताच्या विकास प्रवासाला चालना द्यावी, हा या मोहिमेचा उद्देश आहे. नवोन्मेष आणि संकल्पनांची अंमलबजावणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि एचपीसीएलच्या या उपक्रमाने उद्योग नेत्यांना युवा प्रतिभांशी जोडण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.एचपीसीएलच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे आणि भविष्यातील नेत्यांना घडवण्यासाठी योगदान दिले आहे. उद्योग क्षेत्रानेही या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले असून, यातून परिवर्तनशील बदल घडवून भारताला जागतिक स्तरावर नवोन्मेष आणि ऊर्जा उपायांचा अग्रणी बनवण्याची क्षमता आहे.



















































