पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे बो-हाडेवाडी विनायकनगर, मोशी येथे पुतळे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी येणार्या रक्कम रु. ३२ कोटी ६५ लाख इतक्या खर्चासह एकूण रक्कम रु. ३९ कोटी ४६ लाख खर्चास मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष आण्णा लोंढे होते.
जलशुद्धीकरण केंद्र से. २३ येथील टप्पा १ फिल्टर बेडची वाळू बदलने, सुरक्षा आवरण करणे व तदआनुषंगिक कामे करणेकामी र.रु. १ कोटी ७२ लाख इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. पाणीपुरवठा विभागाकडील भोसरी पंपिंग, भोसरी गावठाण, आश्रम शाळा, शांती नगर व संत तुकाराम नगर परीक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करणेकामी येणार्या र.रु. ७५ लाख ९५ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
पाणीपुरवठा विभागाकडील दिघी व बोपखेल परीक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचालन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करणेकामी येणार्या र.रु. ५९ लाख १३ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. भोसरी उपविभाग अंतर्गत विविध ठिकाणी डी.आय. पाईप लाईन टाकणे व आनुषंगिक कामे करणेकामी येणार्या र.रु. ५२ लाख ३४ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. प्रभाग क्र.११ कृष्णानगर,शिवतेज नगर परिसरातील चेंबर्स व ड्रेनेज लाईनची आवश्यकतेनुसार देखभाल व दुरूस्तीकामी येणार्या र.रु. २८ लाख ९९ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर यांच्या स्मारकासाठी महानगरपालिका बांधकाम खर्च करणार असल्याने क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांना बांधकाम परवानगीसाठी येणारे र.रु. २७ लाख ४६ हजार विकास शुल्क व प्रशमन शुल्क माफ करणेस बैठकीत मंजूरी देण्यात आली.