ppcnews.in
पिंपरी, प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार शाम जगताप, शशिकांत कदम, शकुंतला धराडे व रविना अंगोळकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरांत जाऊन संवाद साधत असताना मतदारांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत केले.
प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर उमेदवारांनी स्पष्ट भूमिका मांडली. “विकासकामांची गती वाढवणे, प्रलंबित कामांना प्राधान्य देणे आणि नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवणे” हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिलावर्ग, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. नागरिकांनी आपल्या अपेक्षा मांडत सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण उपस्थितीमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले असून, भाजपच्या उमेदवारांबाबत मतदारांमध्ये विश्वास आणि उत्साह दिसून येत आहे.
एकूणच प्रभाग क्र. २९ मध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणुकीत चुरस वाढत आहे.




















































