आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक डॉ. संतोष बारणे यांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी ‘विनामुल्य ऑनलाईन योगा क्लासेस’ चे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर उद्या बुधवार दि. १० ते रविवार दि. १४ जून दरम्यान सकाळी ६.३० ते ७.१० तसेच सायंकाळी ६.०० ते ६.४० या दोन सत्रात संपन्न होणार आहे. या योग शिबिरात मान्यवर योग तज्ञ योगाचे धडे देणार आहेत. योगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती, योगाविषयी आवड निर्माण व्हावी आणि योगातून सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी, या सद्हेतूने योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘मोफत ऑनलाईन योग वर्गां’त मोशी व शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घ्यावा. इच्छुकांनी योगा क्लासेससाठी ७०८३६७९०३९ / ९०७५२७२७३६ या मोबाईल क्रमांकावर अथवा http://tiny.cc/Freeyoga या ऑनलाईन लिंकवर रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन डॉ. संतोष बारणे यांनी केले आहे.





















































