ppcnews.in
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, पिंपळे सौदागर परिसरात भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. या संवादातून त्यांच्या कार्यशैलीची बांधिलकी आणि जनतेशी जपलेले नाते अधोरेखित झाले.
नागरिकांच्या सुख-दुःखात सातत्याने सहभागी राहून विकासकामांसाठी पाठपुरावा करणाऱ्या अनिताताई काटे यांनी यावेळी परिसरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, उद्याने तसेच सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रत्येक प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली.

स्थानिक नागरिकांनीही अनिताताई काटे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत, त्या नेहमी उपलब्ध असणाऱ्या आणि प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी असल्याचे मत व्यक्त केले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला.
या संवादातून केवळ प्रचार नव्हे, तर जनतेशी जपलेली नाळ, विश्वासाचे नाते आणि विकासाची ठोस दिशा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.





















































