सांगवी :प्रतिनिधी: ppcnews.in
पिंपरी-चिंचवड:
सामाजिक न्याय, विकास आणि जनहिताच्या लढ्यात सातत्याने अग्रभागी राहिलेले नाव म्हणजे प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव) येथील लोकप्रिय नेतृत्व श्री. प्रशांत शितोळे. कोणताही राजकीय वारसा नसताना, केवळ कार्य, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या बळावर त्यांनी गेल्या २४ वर्षांत जनसेवेचा अमिट वारसा निर्माण केला आहे.
शितोळे यांची ओळख ही केवळ राजकीय कार्यकर्त्याची नसून, सामान्य माणसाचा हक्कासाठी लढणारा खरा सेवक अशी आहे. सलग पंधरा वर्षे मतदारांचा अढळ विश्वास त्यांनी संपादन केला असून, तो विश्वास त्यांच्या कार्याचीच पोचपावती आहे. सांगवीतील रस्त्यांची दुरुस्ती, नवी सांगवीतील जलपुरवठा व्यवस्था, तसेच पिंपळे गुरवमधील शैक्षणिक व नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रभागाच्या विकासाची साक्ष देतात.
“जनता हीच माझी खरी ताकद आहे” या तत्त्वज्ञानावर ठाम राहून त्यांनी प्रभागाच्या प्रत्येक प्रश्नाला स्वतःचा प्रश्न मानले. त्यांच्या कार्यात शब्दांपेक्षा कृती अधिक बोलकी ठरली आहे. मिळालेल्या विश्वासाबाबत ते नम्रपणे सांगतात, “जनतेचा विश्वास हा माझ्या सेवेचा खरा मोबदला आहे. यासाठी मी सदैव ऋणी आहे.”
आजही पर्यावरण संवर्धन, आरोग्य सेवा, नागरी सुविधा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. राजकीय नेत्यापेक्षा समाजाशी नातं जपणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच त्यांची ओळख अधिक ठळक आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे हे नेतृत्व भविष्यातही असेच अविरत राहावे, अशी भावना प्रभागवासीय व्यक्त करत आहेत.





















































