पिपीसी न्यूज नेटवर्क
नवी सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर नवी सांगवी प्रभाग क्रमांक ३१ मध्ये आज सायंकाळी अपक्ष उमेदवार सागर सुनील परदेशी यांच्या प्रचारार्थ निघणाऱ्या पदयात्रेची सुरुवात गणपती मंदिर, कृष्णा चौक येथून होणार आहे.
‘शिट्टी’ हे निवडणूक चिन्ह घेऊन सागर परदेशी आज मोठे शक्तिप्रदर्शन करणार असून, या पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. ढोल-ताशांचा गजर, घोषणा, फलक, बॅनर आणि शिट्ट्यांच्या आवाजात संपूर्ण प्रभाग निवडणुकीच्या रंगात रंगणार असल्याचे चित्र आहे.
प्रभागातील विविध भागांतून ही पदयात्रा मार्गक्रमण करणार असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परदेशी यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी ही रॅली महत्त्वाची मानली जात आहे. अपक्ष उमेदवार असूनही मिळणारा वाढता प्रतिसाद आणि नागरिकांचा उत्साह पाहता, ही पदयात्रा निवडणुकीतील एक टर्निंग पॉइंट ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

या रॅलीच्या निमित्ताने सागर परदेशी नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, प्रभागाच्या विकासासाठीचा आपला स्पष्ट अजेंडा आणि भावी आराखडा मतदारांसमोर मांडणार आहेत. त्यामुळे या भव्य पदयात्रेकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रभाग ३१ मधील राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे संकेत आहेत.
प्रभाग ३१ मध्ये आज सायंकाळी ‘शिट्टी’चा आवाज किती बुलंद होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





















































