करोना प्रसार रोखणाच्या दृष्टीने व सर्वांच्याच आरोग्याच्या हितासाठी सर्व केशकर्तनालये ही पहिल्या लाँकडाऊन पासूनच म्हणजे साधारणपणे तीन महिन्यापासून बंद करण्यात आली होती.
आता शासनाने केशकर्तनालये (फक्त कटींग साठी ) रविवार 28 जून पासून सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु सध्या पुणे शहरात वाढत असलेली करोनाग्रस्तांची संख्या पाहता नाभिक समाजाच्या व्यवसायास त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरसेवक अँड. प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने, परिसरातील नाभिक व्यवसायिकांना स्वामी बॅग्ज निर्मित पीपीई किटचे मोफत वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम आज शनिवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 5.00 वाजता सिंहगड रोड विठ्ठल मंदिर समोर मा. राजेशजी पांडे, संघटक सरचिटणीस भाजपा पुणे शहर यांचे हस्ते पार पडला.
संपूर्ण नाभिक समाजास सदर पीपीई किट वापराने उत्तम सुरक्षा कवच प्राप्त होईल त्यामुळे अँड. प्रसन्नदादा जगताप यांची पीपीई किट वाटपाची कल्पना ही खूपच नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद अशी असल्याचे गौरवोद्गार मा. राजेशजी पांडे यांनी यावेळी काढले.
सदर कार्यक्रमास श्री. रामदास सुर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष, बारा बलुतेदार समाज विकास संघ खडकवासला व पर्वती मतदार संघ, नितीन भुजबळ अध्यक्ष खडकवासला, सुर्यकांत भोसले अध्यक्ष पर्वती तसेच राजेश भोसले, हेमंत श्रीखंडे, महेश सांगळे, निलेश चातूर, प्रकाश क्षीरसागर, अनिल सांगळे, विनायक गायकवाड, स्वप्निल सांगळे हे विविध पदाधिकारी तसेच श्री. विकास चरेकर, लक्ष्मण पवार, गणेश निठाळकर, विठ्ठल पंडीत, चंद्रकांत चरेकर, अमोल काळे, निलेश सैंदाणे, अनंता चरेकर, सुनील हजारे हे नाभिक समाजातील मान्यवर उपस्थित होते. प्रसन्नदादा मित्र परिवारातील स्वामी बँग्ज् चे राहूल जगताप, किशोर कुलकर्णी, सुरेश देशमुख, अजय भानोसे, रवि चौधरी, सुरेश कमतगी, राजाभाऊ कदम, राहूल जोशी तसेच भाजप खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे हे पण उपस्थित होते.





















































