पि. पी. सी.न्युज प्रतिनिधी; अजय जाधव!
संप संपूर्ण जगात करूनच प्रादुर्भाव झालेला असताना पुणे शहरात देखील करोनाचा विळखा वाढत गेला.वाढते करोनाच्या राजूर भावात लोकांची कामे नोकऱ्या गेल्या, लोकांना नोकरीची आवश्यकता असल्याने ते कोठे नोकरी मिळते काय याबाबत चाचपणी करीत असताना पुण्यातील एक भामटा विलास जावळे (रा. रामनगर पुणे)याने रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो सिक्युरिटी गार्डची नोकरी लावून देतो असे सांगून खूप लोकांना फसवणूक करून त्यांच्या मोटारसायकली व मोबाईल घेऊन पोबारा केला. तोबा मत रामटेकडी येथे असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकास मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यास फसवणुकीच्या व वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. अधिक तपास केला असता त्यांनी आणखी सहा गुन्हे केल्याची कबुली दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जानेवारी २०२० मध्ये लोहगाव येथील दोन इसमांना सिक्युरिटी मध्ये काम लावून देतो असे आमिष दाखवून त्यांना पुणे स्टेशन परिसरात बोलून घेतले त्यांच्याकडील एक्टिवा वळून आणतो असे सांगून ती परस्पर घेऊन पळून गेला याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा बंडगार्डन पोलिस ठाण्याचे तपास पथक समांतर तपास करीत असताना पोलीस शिपाई सागर घोरपडे यांना खबर यामार्फत बातमी मिळाली सिक्युरिटी चे काम लावून देण्याकरता लोहगाव येथून घेऊन आलेल्या दोघा इसमांची गाडी घेऊन गेलेला विलास जावळे नावाचा इसम आहे. त्याचा पुढचा व तरुणपणातील फोटो प्राप्त करून त्याआधारे त्याचा शोध घेतला असता फोटोमधील साधर्म्य असणारा पुणे स्टेशन परिसरात फिरत असल्याबाबत तपास पथकाच्या निदर्शनास आल्याने त्याचा तपास पथकाच्या पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याचे नाव विलास जावळे रा. रामटेकडी पुणे याची खातरजमा करून त्यास ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करत असताना त्याने सुरुवातीचे उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्हातील गाडी काढून दिली. अधिक तपासानंतर त्याने अशाच प्रकारचे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन लोकांना नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ०८ वाहने व त्यांच्याकडील ११ मोबाईल फोन चोरून नेल्याची कबुली तसेच त्यांनी कोंढवा, हडपसर, मार्केट परिसरातून वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई परिमंडळ-२चे उपायुक्त सागर पाटील, लष्कर विभागाचे सहा. पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी,पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, हरिष मोरे, संतोष पागार, सागर घोरपडे, अनिल कुसळकर, किरण जाधव, किरण तळेकर, रुपेश पिसाळ, कैलास डुकरे यांनी केली.





















































