आरोग्यशैलीत बदल घडवून वन लाईफची एक व्यक्ती, एक प्रशिक्षक संकल्पना!
पुणे :- तुमचं शरीर निरोगी असेल तर मन निरोगी राहते.तंदुरुस्त राहणे ही गरज असल्याची जाणीव कोरोनाच्या कठीण काळात प्रत्येकाला झाली. या चिरकाल टाकणाऱ्या विचाराला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि निरोगी आयुष्याला दिखाव्यासाठी नाही तर आवश्यकता म्हणून निवडावे याकरिता वन लाइफ या फिटनेस ब्रँडने लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवी संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे.
या अंतर्गत मोटो-वन जीमने एक व्यायामशाळा, एक प्रशिक्षक, एक व्यक्ती, एक जीवन अशी योजना सुरू केली आहे. संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त झाल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत आरोग्य आणि स्वच्छता हे अविभाज्य घटक बनले आहे. हा विचार लक्षात घेऊन जीम मधील सदस्यांना संसर्गापासून दूर ठेवणे आणि शारिरीक आरोग्य शैलीत परिवर्तन घडवून आणणे हे या नव्या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तसेच या अंतर्गत मोटो वनमधील प्रत्येक सदस्यासाठी त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून निरोगी मोजमाप ठेवण्यासाठी एक वैयक्तिक प्रशिक्षक नेमण्यात येणार आहे.
वन लाइफ जीम ही प्रत्येक सदस्याला घर आणि जिममधील वर्कआउटचे प्रशिक्षण देते. तसेच वन लाइफ फिट मशीनसह आहाराबाबत मार्गदर्शनही करते. या ठिकाणी संपूर्ण लक्ष केवळ एका सदस्यावर केंद्रित असल्यामुळे सदस्यासह प्रशिक्षकही त्याच्या निरोगी शरीराची जबाबदारी घेतो. वन लाइफ सदस्याच्या जीवनशैली, प्रवास, काम आणि खाण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून त्याला अनुसरून सेवा प्रदान करण्याकडे वन लाईफ लक्ष केंद्रित करते.
वन लाईफ जीमच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली ही संकल्पना प्रत्यक्षात राबविली जाणार आहे. वर्षभरापासून दीपक माने या संकल्पनेवर काम करत आहे. त्यांनी स्वत: वन लाइफ टीव्ही जाहिरात लाँच करण्यासाठी स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला आहे. वन लाइफने दीपक माने यांच्या टीव्ही अॅडमधील पेहरावाकरिता शदज् क्रिएशनबरोबर भागीदारी केली असून ही जाहिरात लवकरच टिव्हीवर प्रदर्शित होणार आहे. तर पुढील 2 महिन्यांसाठी प्रत्येकाने दररोज एक तास वन लाईफला देण्याचे ठरवले आहे. यातून प्रत्येकजण स्वतःचं स्वतःचे निरीक्षण करून एका निरोगी जीवन शैलीचा भाग झाल्याचे सांगाल, अशी खात्री वन लाईफ टीमला आहे.





















































