पि. पी. सी. न्युज प्रतिनिधी; अजय जाधव!
एका नातेवाईक असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले नाही या कारणावरून तिघांनी मिळून श्याम मारेकर वय ३० यांचे अपहरण केले. विलास वाघमारे यांनी त्याच्या तीन साथीदारांना मार्फत श्याम मारेकर यांनी त्याच्या एका नातेवाईक असलेल्या युतीसोबत लग्न लावून दिले नाही या कारणावरून दिनांक ९/११/२०२० रात्री ९.०० वाजता जबरदस्तीने पळवून नेले.हे सदर गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. सदर अपहरण केलेल्या युवकाचे व त्यास पळून नेले आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी दोन पथके तयार करून त्यांना लवळे, वाकड, ताथवडे व सोलापूर पंढरपूर कडे रवाना करण्यात आले होते.
दाखल गुन्ह्याच्या आरोपीच्या तांत्रिक माहितीच्या आधारे व खबर यामार्फत तपास करताना गुन्ह्यातील आरोपी विलास वाघमारे व त्याचे साथीदार हे अपह्यत इसम श्याम मोरेकर याचेसह सर्व पंढरपूरच्या दिशेने गेल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पंढरपूर मध्ये शोध घेत असताना आरोपींचा मंगळवेढा परिसरामध्ये जाऊन तपास केला असता श्याम रमेश बुरेकर वय ३०रा. साखरे वस्ती, हिंजवडी पुणे. हा व त्याच्या सोबत आरोपी विलास वाघमारे व त्याचे साथीदार वीरेंद्र भीमराव गायकवाड वय १९ वर्षे राहणार पाण्याच्या टाकी जवळ काळा खडक वाकड पुणे, आलम राज बक्सार गोरखाॅ वय १९ वर्षे या. यांना ताब्यात घेऊन हिंजवडी पोलिस ठाण्यामध्ये आणून त्यांच्याकडे तपास केला असता सदरचा गुन्हा त्यांनी आरोपी विलास मागणारे यांनी सर्वांनी मिळून केलेला असल्याची कबुली दिली. आरोपी विलास वाघमारे यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कोण याबाबत तपास केला असता त्या मारेकऱ्याची नातेवाईकांची मुलगी हिच्या सोबत लग्न न लावून दिल्याने तिला भेटण्यासाठी मारे कर याचेअपहरण केल्याचे सांगितले आहे. सदर गुन्ह्याच्या कामी तिघा आरोपींना अटक करून त्यांची पोलिस कस्टडी ची रिमांड घेऊन याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाचे आत पंढरपूर मंगळवेढा येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन आरोपींना अटक करून अपरिचित व्यक्ति श्याम मोरेकर यांची सुटका करण्यात व आरोपींना जेरबंद करण्यात हिंजवडी पोलिसांनी यश प्राप्त केले आहे.
सदरची कामगिरी ही आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परी-२ पिंपरी चिंचवड आनंद भोईटे, सहा पोलीस आयुक्त वाकड विभाग गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी बाळकृष्ण सावंत, सागर काटे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, किरण पवार, अतीक शेख, कुणाल शिंदे, हनुमंत कुंभार, सुभाष गुरव, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू यांनी केली आहे.





















































