राष्ट्रवादी काँग्रेस सांगवी-पिंपळे गुरव ब्लॉकचे अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांच्या वतीने व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 31 मधील स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनींना कपडे व वाफ घेण्याचे मशीन अशी अनोखी भाऊबीज दिवाळी भेट म्हणून देण्यात आली.
कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, शिवाजी पाडुळे, युवक प्रभारी प्रणव ढमाले, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, उद्योजक सुनील गावडे, शशिकांत ढमाले, प्रताप राणे, सुरेश धमाले, प्रमोद करपे, ओंकार गोडांबे, अध्यक्ष मुजाहिद बागवान, गौरव पाडुळे, संकेत गुळवे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत शितोळे यांनी सांगितले, की कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वच्छतेचे कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.
शिवाजी पाडुळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, थंडीच्या दिवसात सर्दी, ताप, खोकला अशा आजारांमध्ये वाढ होत असते. सफाई कर्मचारी हे स्वच्छतेचे काम करत असताना अशा आजाराने त्रस्त होऊ नयेत, म्हणून यांच्या आरोग्याची काळजी घेत आपण दिवाळी भाऊबीज म्हणून वाफ घेण्याचे मशीन भेट दिले आहे.



















































