भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित ‘इंटरनेट ऑन थिंग्स फॉर फ्यूचरिस्टिक स्मार्ट सिस्टिम्स ‘ विषयावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन प्राचार्य डॉ आनंद भालेराव आणि प्रमुख पाहुणे कॉपर क्लाऊड आय.ओ.टी. प्रा. लि. चे संस्थापक अभिजित देवगिरीकर यांच्या हस्ते झाले . पाच दिवसीय हा प्रोग्रॅम असून १७ मे ते २१ मे दरम्यान त्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ श्रुती ओझा,प्रा .स्वप्नील थोरात यांनी संयोजन केले . १३२४ विद्यार्थी ,संशोधक आणि शैक्षणिक -उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
उदघाटन कार्यक्रमात बोलताना डॉ आनंद भालेराव म्हणाले,’सर्वांना परवडू शकेल आणि उपयुक्त ठरेल अशी तंत्रज्ञान क्रांती आपल्याला हवी आहे . जगाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘इंटरनेट ऑन थिंग्स ‘ हा अशा तंत्रज्ञान क्रांतीतील एक भाग आहे . यावर उद्योग क्षेत्र अधिकाधिक गुंतवणूक करीत आहे ,अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना या तंत्रज्ञानाआधारे समाजाचे प्रश्न सोडविण्याची चांगली संधी आहे .
अभिजित देवगिरीकर म्हणाले,’इंटरनेट ऑफ थिंग्स ‘ चे तंत्रज्ञान हे भारतीय बाजारपेठेला मोठे योगदान देणारे ठरू शकते . हा फक्त तंत्रज्ञानाचा विषय नसून सर्वसामान्य ग्राहकांनाही त्याचा फायदा होणार आहे’.