पि. पी सी न्यूज प्रतिनिधी; अजय जाधव!
बेजबाबदार व निष्काळजीपणाने काम करणाऱ्या चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांची हकालपट्टी करण्याचा आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला.
याबाबत अधिक माहिती देताना चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत असताना रवींद्र जाधव यांनी १९ ऑक्टोबर २०२० रोजी हाती कोणताही पुरावा नसताना एका व्यक्तीला विनयभंगाच्या खोट्या आरोपावरून अटक केली. तसेच दुसऱ्या एका प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल एका महिलेला नियमबाह्य अटक केली.
यादरम्यान ही कारवाई करण्यापूर्वी रवींद्र जाधव यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. याच जाधव यांच्याविरुद्ध लोकांनी अनेक तक्रारी आयुक्तांकडे केल्या होत्या.
या संदर्भात सखोल चौकशी करण्यात आली त्यात रवींद्र जाधव यांनी बेशिस्त बेकायदेशीर व बेजबाबदारपणे सेवा केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांच्यावर तेच ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या कारवाईबद्दल समाजातील सर्व स्तरातून आयुक्तांचे आभार मानण्यात आले





















































