पि. पी सी न्यूज प्रतिनिधी; अजय जाधव!
सातारा; वाई;दि.१९! सातारा जिल्ह्यातील वाई उमरगा भागातील ६००ऊसतोड रहिवासी कामगारांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या लहान मुलांना खाऊचे वाटप भारतीय महा क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
हा फराळ आणि खाऊवाटप आता समारंभ वाई येथे गुरुवार दिनांक १९ रोजी संपन्न झाला. यावेळी भारतीय महा क्रांती सेनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद दळवी व सागर भोसले तसेच सेनेचे अन्य पदाधिकारी आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सकुंडे यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी लढा उभारण्याचा इशारा दिला. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून सोय करण्याची मागणी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सागर भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. प्रमोद दळवी यांनी आभार मानले.





















































