कोरोनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा व्यवसाय तीन महिन्या पासुन बंद आहे. नॉन रेडझोनमध्ये काही अटी शर्तीच्या आधारावर रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर हे रेडझोन मधुन वगळण्यात आले आहे. यामुळे शहरात रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु रिक्षा चालक आणि प्रवासी यांची सुरक्षा राखली जावी या बाबत आरटीओ अधिकारी वाहतुक शाखा अधिकारी आणि रिक्षा संघटना पदाधिकारी यांच्यात गेली अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. रिक्षा चालक आणि ग्राहक दोघांच्या सीटमध्ये प्लास्टिक ट्रान्स्फर असलेला पडदा लावणे, रिक्षात सॅनिटाईसर आणि इतर साधने बाळगणे आवशक आहे. परंतु गेली अनेक दिवसापासून रिक्षा बंद असल्यामुळे, आधिच अडचणीमध्ये सापडलेल्या रिक्षा चालकास अधिक आर्थिक भुर्दंड सहन न करता सुरक्षेचे सर्व साधन वापरत रिक्षा चालविण्याबाबत आरटीओ आणि वाहतूक शाखा वरिष्ठ अधिकारी यांचे एकमत झाले असून रिक्षा चालकांना सुरक्षा साधन वापरणे तसेच चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दोन्ही बाजुने दिसेल असा प्लास्टिकचा पडदा बसविण्याबाबत एकमत झाले असून सर्व रिक्षांना अश्या प्रकारे पडदा बसविण्याबाबत चर्चा सुरु आहे.
याबाबत सुरक्षा पडदा कसा असावा, ऊन, वारा, पाऊस तसेच सुरक्षा पडदा फाटू नये अथवा त्याचे नुकसान कोणी करू नये, याबाबत गेली दोन दिवसापासून वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक (नियोजन) हे वेगवेगळ्या रिक्षांना वेगवेगळ्या स्वरूपात सुरक्षा पडदे लावून पाहणी करत आहेत. रिक्षा हे वाहन पूर्णपणे मोकळे असल्यामुळे सुरक्षा पडद्याचे कोणी नुकसान करू नये. यासाठी तो पडदा काढता येईल आणि रोज बसवता येईल असल्या स्वरूपाचा पडदा विविध कारागीर यांच्याकडून बनवून घेऊन तो रिक्षाला लावुन पाहावे या बाबत रिक्षा चालकांचे मत विचारात घेणे. रिक्षा चालकांची आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत गेली दोन दिवस पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळ हे अत्यंत काळजी पूर्वक काम पाहत आहेत. अनेक रिक्षाची पाहणी झाल्यानंतर रिक्षाला सुटसुटीत रोज काढता बसवता येईल असा पडदा बसविण्या बाबत एकमत झाले असुन प्रसाद गोकुळे यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे आणि रिक्षा चालकांसोबत चर्चा करून या बाबत निर्णय घेतला आहे.
याबाबत बाबा कांबळे म्हणाले रिक्षा व्यवसाय सुरु व्हावा यासाठी गेली अनेक दिवसापासून महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने प्रयत्न सुरु असुन यात आता यश आले आहे. वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा जाधव, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडशिकर यांनी रिक्षा चालकाच्या अडचणी समजुन घेत सशर्त परवानगी देण्याबरोबरच रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेत मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे आत्ता सर्व अडथळे दुर झाले असुन पिंपरी चिंचवड शहरात लवकरच रिक्षा व्यवसाय पूर्वपदावर येणार आहे.