प्रतिनिधीः- अजय जाधव / पुणे
पुणेः- ईगल स्पोर्ट क्लब गणेश मंदिर समोर काल दिनांक 24/2/2021 रोजी सांय 5.00 वाजता संदीप शांताराम गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते) व बशीरा फिरोज शेख (वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा) दापोडी विभाग यांच्या प्रयत्नातून C_C_T_V कॅमेरा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी सोहळ्यामध्ये मा. शंकर आवताडे साहेब (वरिष्ट पोलीस निरिक्षक भोसरी पोलीस स्टेशन) उपस्थित होते.
सध्या कायदा व सुव्यवस्ता राखण्याच्या दृष्टीने C_C_T_V कॅमेरा उपयुक्त आहे. त्यामुळे ही यंत्रणा नक्कीच योग्य ठरेल यात शंकाच नाही. ईगल स्पोर्ट क्लब गणेश मंदिर समोर कॅमेरा बसवल्यामुळे आजुबाजुच्या सर्व हालचालीचे स्पष्ट चित्रण करणे शक्य होईल.