‘युथ कनेक्ट’ आयोजित I’m Responsible चा संदेश देणारे भिंती चित्र व सेल्फी पॉइंट
पुणे:- नागरिक या महामारीचे शिकार झाले होते त्यांचे अनुभव ऐकले तर अंगावर काटा येतो इतका भयानक तो रोग आहे. आणि करोनाचे संकट अजून गेलेले नाही त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हीच काळाची गरज आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांनी सांगितल्या प्रमाणे “मी माझी जबाबदारी” यांचे पालन करत मास्क, सॅनिटाइजर, फिजिकल अंतर या सर्व नियमांचे पालन केले तर खर्या अर्थाने आपण कोरोना वर विजय मिळवू शकतो. असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केले.
करोना योध्यांना समर्पित आणी करोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून व ‘युथ कनेक्ट फोरम’ यांच्या आयोजनातुन इन्दधनुष्य हॅाल, म्हात्रे पुल रोड, दत्तवाडी येथे हे भिंती चित्र व सेल्फी पॉईंट तयार करणार आले आहे. या चित्रामध्ये रोग प्रतिकारशक्ती चे रुप दर्शवणारी नारी चित्रीत केली आहे. जी संदेश देते की, हात धुवा, मास्क, सॅनिटाइजर वापरा, फिजिकल अंतर पाळा, योग्य आहार घ्यावा. हे चित्र प्रसिद्ध आर्टिस्ट फाल्गुनी गोखले यांचे आहे व पेंटिंगचे काम प्रसिद्ध आर्टिस्ट संजीव पवार, दिग्विजय कुंभार यांनी केले आहे. आजच्या कार्यक्रमचे आयोजन हे राहुल पोटे (अध्यक्ष, युथ कनेक्ट) यांनी केले या प्रसंगी, सुशांत ढमढेरे, प्रियांक शाह, अभिजीत बारवकर, गणेश नलावडे, कृष्णा मेहता, गणेश मोहीते, विनायक हनमघर, समिर पवार, विकी वाघे, स्विकार देशपांडे, सचिन बेनकर, फईमभाई शेख, गितांजली सारगे, अश्विनी परेरा, सोनाली गाडे, श्रद्धा जाधव, ओम कासार, अमोल पोतदार, ययाती चरवड, विशाल मोरे, पवनराजे बंबुळगे, गजानन लोंढे, ऋुषीकेश भुजबळ, मोहसीन काझी, अभिजीत भिसे मंगेश जाधव तसेच युथ कनेक्ट चे सभासद उपस्थित होते. आभार प्रियांक शहा यांनी मानले तर स्वागत अभिजीत बारवकर यांनी केले
खासदार चव्हाण म्हणाल्या,आजच्या तरुणाईला ‘युथ कनेक्ट’ च्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ उपलब्ध आहे. युवकांच्या विचांना आणी उर्जाला येथे चांगला वाव मिळतो, युथ कनेक्ट च्या व्यासपीठा मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून आज हे भिंती चित्र बनविले आहे.