पुणे (वडगावशेरी) :- जागतिक महिला दिना निमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने वडगावशेरी येथील महिला सफ़ाई कर्मचाऱ्यांचा शाल, फुल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे, वडगावशेरी मतदार संघाचे युवक अध्यक्ष किरण खैरे, मनोहर चांधेरे, अनिकेत मुळे, अनिकेत चांधेरे, रुतिक चांधेरे, रोहित खंडागळे, संकेत बायस, अमोल चांधेरे, गणेश आंबेडकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस मोरेश्वर चांधेरे यांनी केले होते.





















































