पुणेः- जागतिक महिला दिनानिमित्त निर्मल महिला वृद्धाश्रम हांडेवाडी रोड येथे साई सोशयल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन व भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन तर्फे वृद्ध महिलांना साडी, फळ, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात फाउंडेशनचे (संस्थापक अध्यक्ष) फिरोज खान, (सचिव) विजय चव्हाण, (उपाध्यक्ष) विजय भिकोळे, (सदस्य) सुषम राजन, (सदस्य) संजीवनी धनगर, (सदस्य) जेनिफर राजन, (सदस्य) राजेश घागरे, (सदस्य) अमृता माने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.





















































