पुणे : कोविड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होळी व धुलीवंदन सण / उत्सवसार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच याचे पालन केले नाहीत तर कडक कारवाईचे आदेश देखील दिले आहेत. सद्यस्थितीत राज्यात व पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा (कोविड- १९) संसर्ग व प्रादुभाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील यात्रा / उत्सव आयोजित यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नागरीकांनी साजरे होणारे होळी व धुलीवंदन सण /उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे होळी, धुलीवंदन व रंगपंचमी हे सण / उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे.