वानवडी प्रभाग क्रमांक २५ मधील एसआरपीएफ ग्रुप क्र. २ चे पोलीस जवान व अधिकारी मागील ३ महिन्यापासून मुंबई येथे विविध ठिकाणी कोरोना निमित्त बंदोबस्तासाठी कार्यरत होते. काल हे सर्व कर्मचारी तेथील बंदोबस्त आटोपून पुणे येथे दाखल झाले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने सर्व पोलिस जवान व अधिकारी यांना वानवडी मधील ह. ब. गिरमे विद्यालय, पुणे महानगरपालिकेची महादजी शिंदे शाळा , एसआरपी शाळा क्रमांक ८८ आणि अलंकार हॉल येथे क्वारनटाईन करण्यात आले आहे. या सर्वांची मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी नगरसेवक प्रशांत जगताप मित्र परिवाराच्या वतीने व भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या सहकार्याने करण्यात आली.
वानवडीमध्ये नगरसेवक प्रशांतदादा जगताप यांच्या वतीने पोलिसांची आरोग्य तपासणी
Share this: