कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड वरील गोयलगंगा परिसरात कार्यरत असलेल्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात आज क्षेत्रिय कार्यालयाचे झोनल कमिशनर श्री. भोसेकर, वाँर्ड आँफीसर श्री. कबाडे, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिपक पखाले, डॉ.नितीन वीर, आरोग्य विभागातील अधिकारी वर्ग, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये गेल्या दोन अडीच महिन्यातील आपल्या भागातील आरोग्य विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच यापुढे देखील नागरिकांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, तोंडाला मास्क लावणे, सतत साबणाने हात धुणे, कारणाशिवाय घराबाहेर न पडणे, गर्दी टाळणे याचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. तरच आपण या महामारीचा सामना करू शकतो. याबाबत येथून पुढे अजून जास्त तत्परतेने काम करण्याची गरज असल्याचे नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनी झोनल कमिशनर श्री. भोसेकर, वाँर्ड आँफीसर श्री. कबाडे व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स यांचे स्वागत केले.
आज एकमेकांची प्रत्यक्ष भेट झाल्याने अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये एक चांगला समन्वय साधला गेला.
नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांनी घेतली कोरोना आढावा बैठक
Share this: