पिपीसी न्यूज नेटवर्क!
खराडी : खराडी बाय -नगर हायवे रस्त्यावर बीआरटी मार्गावरून वारजेमाळवाडी ते वाघोली या मार्गे जाणाऱ्या बसला विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. जोराची धडक बसल्याने सीएनजी बसनेे तात्काळ पेट घेतला. या आगीत बस जाळून खाक झाली. यात दुचाकी चालकाच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला.
ही घटना सकाळी १० वाजता घडली. अजिंक्य येवले (वय २५) असे दुचाकी चालकाचे नाव असून त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. संतोष किशोर माजिर ( २८ वय) असे बस चालकाचे नाव आहे. चंदननगर बायपास बीआरटी मार्गातून वारजेमाळवाडी ते वाघोली या मार्गे जाणाऱ्या बसला विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या दुचाकीची बसच्या उजव्या बाजूस धडक जोरात धडक बसली. त्यामुळे दुचाकीला चालक उडून बाजूला पडला. आणि त्याची दुचाकी बसच्या उजव्या बाजूच्या चाकाखाली गेल्याने बसचा टायर फुटला. बस दुभाजकाला घासली. प्रसंगावधान राखून बस चालकाने दरवाजे उघडले. कंडक्टरने तात्काळ सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे प्रवशी बचावले. बसमध्ये सुमारे २० ते २५ प्रवशी होते. घटना १० मि अग्निशमनची गाडी दाखल झाली. आगआटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. असे बस चालकाने सांगितले.





















































