पुणे : कोरोनामुळे शरीरात अँटीबीडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे आपणही त्या दान करून दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो. याची माहिती मिळताच एका रुग्णाला प्लाझ्माची गरज आहे असे समजले, त्याच वेळी कोणताही विचार नकरता प्लाझ्मा दान करायला गेलो. त्यामुळे आपण दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो. याची जाणीव होताच डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्षभरात आतापर्यंत ६ वेळा प्लाझ्मा दान करून १ २ जणांचे जीव वाचविण्याचे भाग्य मिळाले. असे अकबर पठाण यांनी सांगितले. या कृतीतून त्यांनी माणुकीचे दर्शन घडविले आहे. यामुळे त्यांचे अनेक स्थरातून कौतुक होत आहे.
कोरोनाचा पहिला काळ खूपच कठीण गेला. त्यावर कोणतेही प्रभावी औषध नव्हते. यामुळे कोरोना झाला तर कसे होणार याची भीती मनामध्ये होती. दुर्दैवाने कोरोनाने घात केलाच. रुग्णालयात १५ दिवस रहावे लागले. यावेळी घरच्यांना आणि स्वतःला झालेला त्रासामुळे खूप मोठ्या वाईट अनुभवाला समोरे जावे लागले.अशी वेळ शत्रूवरही येऊ नये अशी प्रार्थना करून रुग्णालयातून घरी परतलो. असे सांगताना ते भारावले.
प्लाझ्मा दान करणे म्हणजे रक्तदान करणे असे सुरुवातीला वाटत होते. मात्र रक्तकाढून घेतल्यानंतर त्यातून द्रव्यासारखा असलेला प्लाझ्माचा घटक काढून घेतला जातो. आणि पुन्हा ते रक्त शरीरात सोडले जाते. त्यामुळे शरीराला कोणताही धोका जाणवत नाही. एक दिवस आराम केला की पुन्हा ताजेतवाने वाटते. यावर आपण कोणाचा तरी जीव वाचवतोय ही गोष्ट मनाला खूप काही सांगून गेलेली असते. या भावनेत कुठे जात असते ना धर्म. कोरोनामुळे त्रास झाला हे खरे असले तरी हाच कोरोना दुसऱ्याचा जीव वाचवायला मदत करतोय. ही बाब आश्र्चर्यचकित करणारी आहे. असे अकबर सांगतात.
पुढे ते सांगतात की , सध्या जरी लस बाजारात अली असली तरी सर्वांनाच मिळातेय असे नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे. जर आपण पूढे होऊन प्लाझ्मा दान केले तर दुसऱ्याचा बहुमूल्य जीव वाचविण्यासाठी आपण कामी येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील तयार झालेल्या अँटीबीडीज उपयोग स्वतःसह दुसऱ्यासाठी उपयोग करा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
केशवनगर आणि शहरातील आदी भागातील व्यक्तींचा व्हाट्सएप ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून ज्या रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे, त्यांच्या पर्यंत प्लाझ्मा दाते पोहचून त्यांची मदत करतात, तेही एक पैसाही नघेता. त्यामुळे अनेकांचे जीव वाचविण्याचे भाग्य या ग्रुपमधील सदस्यांम मिळाले आहे. सुमारे २२५ सदस्य या ग्रुप मध्ये असून रक्तदान करणे, प्लाझ्मा दान करणे यासाठी मदत करतात. आता पर्यत सुमारे ५० ते ६० व्यक्तींना प्लाझ्मा दान करता आला आहे. असे ग्रुप ऍडमिन प्रवीण प्रधान यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपी काय आहे?
आपल्या शरीरामधील रक्ताचे 4 मुख्य घटक लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा हे रक्ताचा द्रव भाग आहे. ह्या प्लाझ्माच्या साहाय्याने, आवश्यकतेनुसार अँटीबॉडीज तयार केल्या जातात. रक्तातला प्लाझ्मा वेगळा काढून घेतला जातो. हाच प्लाझ्मा आता इतर कोव्हिड रुग्णांचे जीव वाचवू शकतो. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये अँटीबीडीज तयार झालेल्या असतात. त्याच्या अँटीबीडीजचे प्रमाण बघून दात्याला आणि गरजूला धोका नसेल तरच त्याचा वापर केला जातो.