पुणे:- शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय, महापालिका सहायक आयुक्त आशा राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने कारवाई चालु आहेत.शुक्रवार दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी पुणे मुंबई रस्ता, वाकडेवाडी, येथे कॕलिबर बिझनेस सपोर्ट सव्हिसेस प्रा.लि या कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली आसता सदर कंपनीतील ८७ कर्मचारी काम करत होते. या कार्यालयात सामाजिक अंतर पाळल्याचे आढळुन आले नाही. त्यानुसार या कंपनीला 87,000/- रुपये दंड करण्यात आला आहे.तसेच यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील केले जाईल अशी ताकीद देण्यात आली आहे तसेच मास्क न वापरणाऱ्या १९ जणावर कारवाई करण्यात आली, असे एकुण १००१८० दंड आकारण्यात आला.
महापालिकाने आखुन दिलेल्या नियमानुसार आस्थापना चालू ठेवाव्यायात अन्यथा कोविड प्रतिंबधासाठी अजुन कारवाई कठोर करण्यात येईल आसे प्रतिपादन सहा.आयुक्त आशा राऊत यांनी केले आहे..
या कारवाईस महापालिका सहाय्यक आयुक्त आशा राऊत,वरिष्ठ आरोग्य निरिक्षक आय.एस.इनामदार, सुनील कांबळे,व आरोग्य निरिक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी व सह्याक राजेश अडागळे हे हजर होते.




















































