चिंचवड प्रतिनिधी :अजय जाधव:
चिंचवड विधानसभा रावेत, किवळे, मामुर्डी परिसरात जोरदार प्रचार दौरा संपन्न झाला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी फुलांच्या वर्षावात आणि फटाक्यांची आतिषबाजी करून बंधू-भगिनींनी जोरदार स्वागत करण्यात आले. मागील पाच वर्षात मतदारसंघात जवळपास एक लाखापेक्षा अधिक मतदारांची भर पडली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यावर मी भर देणार आहे. या मूलभूत सुविधा मिळाल्या तरच खऱ्या अर्थाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास यावेळी नागरिकांशी सवांद साधताना व्यक्त केला.सर्वपक्षीय मान्यवरांसह विविध कॉलनी, सोसायट्या आणि वसाहतीतील मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन सर्वांगीण विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा आशिर्वाद द्यावा, असे आवाहन केले.





















































