समाधानी माणूस हा प्रामाणिक कलाकारच असतो.
1) कलेचा वारसा लाभला कसा लाभला? कुटुंबातूनच कलेचा वारसा मिळाला का?
= माझे वडील अतुल शिधये हे चित्रपट सृष्टीत छायाचित्रकार आणि मेकअप आरटिस्ट आहेत .त्यांच्या मुळे मी लहानपणापासून कलेचे काही ना काही बघते आहे.त्यामुळेच मला अभिनयाची आवड निर्माण झाली .पहिल्यांदा मी ५ वर्षाची असताना देवी अहिल्या नावाच्या चित्रपटात काम केले आहे.
2) या क्षेत्रातच का आलात? या क्षेत्राने आतापर्यंत तुम्हाला काय दिले?
= महाविद्यालयात असताना मी एका शोर्ट फिल्मला सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केले त्यामुळे या क्षेत्राची आवड अधिकच निर्माण झाली कला हे एक अस क्षेत्र आहे ज्यात तुम्ही स्वतःचे विचार कलामाध्यामातून पोहोचवू शकता.हेच कलेने मला दिले.
3) या क्षेत्रात आज प्रगती करीत आहात त्याचे श्रेय कोणाला देते?
= माझे बाबा यांना मी श्रेय देते आणि त्याच प्रमाणे माझ कुटुंब देखील आहे.माझ्या प्रत्येक पावलात कुटुंब आणि बाबा हे अतिशय सकारात्मकपणे पाठीशी उभे होते..नाटक ,अभिनय ,शोर्टफिल्मस् सगळ्याला पाठींबा आर्थिक देखील कुटुंबाने दिला आहे याचा मला अभिमान वाटतो .माझे गुरु शामराव जोशी यांचा आशीर्वाद देखील मिळतो . दिग्पाल लांजेकर यांना देखील श्रेय देते .
4) या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे किती अवघड आहे? ते तुम्ही कसे करता?
= स्पर्धा हि प्रत्येक ठिकाणी आहे त्याला सामोरे जावेच लागणार आहे माझी स्पर्धा हि स्वतःशीच आहे मी स्वतःसाठी शिकण्याचा विचार करते आणि ग्राफ त्यानेच वाढतो असे मला वाटते
5) फावल्या वेळात तुम्ही कोणता छंद जोपासता?
= मी प्रचंड फिल्म्स बघते एक अभ्यास विषय म्हणून त्याच्याकडे बघते.रोज एक फिल्म बघते. न चुकता ठरवून मी फील्म बघते त्यातून खूप शिकायला मिळते आणि इम्पप्रुव होतो आपण त्याने ..
6) तुमचे भविष्यातील नियोजन काय आहे? पुढील काळात तुम्ही काय करणार आहात?
= सध्या माझे अँटीगिनी नावाचे नाटक करत आहे.त्या बरोबरच माझी हलाल माझी आणि शॉरट फिल्म करते आहे.बाकी माझा अभ्यास देखील सुरु आहे अनेक अनेक विषय मला अभिनय दिग्दर्शन या माध्यमातून हाताळायला आवडतात .
शब्दांकन – तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादक- पीपीसी न्यूज नेटवर्क ,पुणे.)