* *विनय सोनवणे यांची पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड*
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी | मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया परिषदेच्या अध्यक्षपदी सांगावा न्यूजचे संपादक विनय सोनवणे यांची निवड झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी सेलू, परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघ पुरस्कार सोहळ्यात डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी विनय सोनवणे यांना त्यांच्या निवडीचे पत्र दिले. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांच्या आदेशाने आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले व कार्याध्यक्ष अविनाश आदक यांच्या मार्गदर्शनाखाली विनय सोनवणे यांची निवड करण्यात आली.
या निवडी संदर्भात पत्रकार सागर सूर्यवंशी यांनी सूचित केलेल्या प्रस्तावाला माजी अध्यक्ष महावीर जाधव यांनी अनुमोदन केले व बहुसंख्य पत्रकार सदस्यांच्या उपस्थितीमध्ये विनय सोनवणे यांची पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. थेरगाव येथील आयोजित बैठकीत नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा देवून पुढील काळात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून अडचणी दुर करण्यासाठी सोनवणे यांना पुर्ण सहकार्य करु, असा ठराव करून उपस्थित सर्वांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या. या वेळी उपस्थित सदस्यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. ” पत्रकारितेतील पदवीधर असलेले अध्यक्ष आपल्या डिजिटल मीडिया परिषदेला लाभले त्याचा संघटनेला नक्कीच फायदा होईल असे मत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांनी व्यक्त केले ”
यावेळी. परिषद उपाध्यक्ष गणेश मोकाशी यांच्या सह पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, माजी अध्यक्ष महावीर जाधव , पत्रकार सागर सूर्यवंशी, डिजिटल मीडिया उपाध्यक्ष संतोष गोतावळे, प्रसिध्दी प्रमुख रामकुमार शेडगे, जिल्हा संघटक चिराग फुलसुंदर, RTI कार्यकर्ते आणि पत्रकार अशोक कोकणे, सिद्धांत चौधरी, रमेश साठे, पराग डिंगणकर, राकेश पगारे, प्रसाद वडघुले, सांगावा न्यूज चे संपादक व पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सोनवणे उपस्थित होते. अध्यक्ष निवडी नंतर पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, एम जी शेलार, सुनिल वाळुंज, परिषद प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या.





















































