पुणे :(ppcnews.in)
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ नादमाधुरी’ प्रस्तुत ‘अष्टनायिका’ हा सांगीतिक कार्यक्रम शनिवार,दि.२१ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे.डाॅ.माधुरी डोंगरे यांची संकल्पना असलेल्या या सांगीतिक कार्यक्रमात त्यांनीच लिहिलेल्या बंदिशींतून नायिकांच्या भावावस्थांचे दर्शन घडवले जाणार आहे.संहिता किशोरी उपाध्ये यांची आहे.बंदिशींचे गायन डॉ.रेवा नातू,अंजली मालकर आणि किशोरी जानोरीकर करणार आहेत.स्वाती करंदीकर(तबला),मीनल नांदेडकर(संवादिनी) या साथसंगत करणार आहेत.कार्यक्रमाचे निवेदन मंजिरी जोशी करणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत प्रस्तुत होणारा हा २४९ वा कार्यक्रम आहे.सर्व रसिकांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.



















































