पुणे :(ppcnews.in)
वस्त्र व्यापार, अन्नप्रक्रिया आणि विविध उच्चविकास क्षेत्रांत कार्यरत असलेला ४ अब्ज डॉलर्सचा आंतरराष्ट्रीय बहुराष्ट्रीय समूह बीटा ग्रुप आता अधिकृतपणे भारताच्या रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रवेश करत आहे. केरळस्थित आघाडीची बांधकाम व प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनी अंटा बिल्डर्समध्ये धोरणात्मक गुंतवणूक करत बीटा ग्रुपने ही घोषणा केली आहे.या भागीदारीचा एक भाग म्हणून बीटा ग्रुप अंटा बिल्डर्समध्ये १० टक्के हिस्सा विकत घेणार असून, यासाठी कंपनीची एकूण किंमत ५५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा करार दोन्ही कंपन्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, भारतात शहरी विकासाच्या क्षेत्रात संयुक्तपणे विस्तार आणि नवोन्मेषासाठी ही भागीदारी आधारभूत ठरणार आहे.

थिरुवनंतपुरममध्ये झालेल्या कराराच्या स्वाक्षरी कार्यक्रमात बीटा ग्रुपचे संचालक राजनारायण पिल्लई आणि अंटा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक मिधुन कुरुविला कुरियन यांनी सामंजस्य करार व शेअरहोल्डिंग करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज वर्गीस आणि बीटा ग्रुपचे अध्यक्ष राजमोहन पिल्लई उपस्थित होते.या गुंतवणुकीच्या माध्यमातून बीटा ग्रुप अंटा बिल्डर्सच्या संचालक मंडळात सामील होणार असून, दीर्घकालीन सहकार्य करणार आहे.
भारताच्या शहरी परिवर्तनात अर्थपूर्ण सहभाग घेण्याच्या आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा हा भाग आहे, असं बीटा ग्रुपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.या संयुक्त भागीदारीमुळे देशभरात रिअल इस्टेट व पायाभूत प्रकल्पांसाठी ₹५०० कोटींच्या निधी उभारणीची योजना आहे. बंगळुरू, हैदराबाद, पुणे, मुंबई आणि गुरुग्राम या वेगाने विकसित होणाऱ्या शहरी केंद्रांमध्ये विस्तार करण्यावर यामध्ये विशेष भर राहणार आहे.या सहकार्याच्या मुख्य दिशा आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान व शाश्वत इमारत पद्धतींचा अवलंब, स्मार्ट सिटी व हरित पायाभूत प्रकल्पांमध्ये विस्तार, उच्चमूल्य पायाभूत सुविधा निर्मितीची क्षमता वाढवणे आणि प्रमुख मेट्रो शहरांमध्ये निवासी व व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक यावर केंद्रित असतील.केरळमध्ये अनेक प्रकल्प सुरू असलेल्या अंटा बिल्डर्ससाठी ही भागीदारी राष्ट्रीय स्तरावर स्थान निर्माण करण्याची संधी असून, भारतातील रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात उदयास येण्यासाठी ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

(अंटा बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक मिधुन कुरुविला कुरियन आणि बेटा ग्रुपचे संचालक राज नारायण पिल्लई यांच्यात सामंजस्य करार (MoU) आणि शेअरहोल्डिंग करारांची देवाणघेवाण होताना. किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज वर्गीस, बेटा ग्रुपचे अध्यक्ष राजमोहन पिल्लई आणि क्लायंट असोसिएट्सचे मधु कुमार हेही या वेळी उपस्थित.)




















































