पि पीसी न्यूज: पुणे प्रतिनिधी!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी द्वारे राज्यात घेण्यात येणाऱ्या ज्ञानपीठ इंग्रजी परीक्षेत 50 पैकी 50 गुण मिळवून करण अजित ठोंबरे यांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला.
करण अजित ठोंबरे हा बालशिक्षण मंदिर भांडारकर रोड येथील शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत असून. ज्ञानपीठ इंग्रजी परीक्षा त्याने मागच्या वर्षी इयत्ता तिसरी मध्ये दिली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला.

करण ठोंबरे याला मिळालेल्या यशाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्गांकडून त्याची मिरवणूक काढून कौतुक करण्यात आले.
पैकीच्या पैकी गुण मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर टाकल्याबद्दल मुख्याध्यापकांकडून तसेच वर्ग शिक्षकां कडून अभिनंदन करण्यात आले.





















































