ओम साई ग्रुप यांच्यावतीने सन्मान सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
काळेवाडी (ppcnews.in): पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेतृत्व, ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे काळेवाडी – रहाटणी मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 ते 6 वाजता आरंभ बॅक्केट हॉल ( भोईर लॉन्स) बी. आर. टी रोड विजय नगर, काळेवाडी -17 येथे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान गुणवंताचा गौरव अखंड शिकण्याचा या वाक्याप्रमाणे 10 वी आणि 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शक, व्याख्याते अनिल गुंजाळ सहाय्यक आयुक्त शिक्षण अधिकारी सहाय्यक सचिव, एसएससी बोर्ड पुणे यांचे करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यां मधून लकी ड्रॉ बक्षीस काढण्यात येणार आहे , यामध्ये प्रथम बक्षीस आर्थिक मदत ( प्रथम पाच विद्यार्थ्यांसाठी), द्वितीय बक्षीस 64GB टॅब, तृतीय बक्षीस सॅग असे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी ओम साई ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काळेवाडी रहाटणी परिसरातील इयत्ता दहावी ,बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मार्कशीट प्रत सोमनाथ दादा तापकीर यांचे जनसंपर्क कार्यालय तापकीर मळा चौक, नानाश्री हॉटेल जवळ काळेवाडी येथे जमा करावी तसेच या सन्मान सोहळ्याला व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.





















































