पि पी सी न्युज;अजय जाधव!
तानाजी पवार यांचे कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावस येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ बनसोडे याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवार याने याउलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे व त्याच्या साथीदारांनावरच अपहरण व हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सिद्धार्थ बनसोडे वर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थ वर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडे हवा होता अखेर रत्नागिरी जिल्ह्यातून पावस येथे त्याला अटक करण्यात आली.
पिंपरी महानगरपालिकेचे कंत्राटदार सिंधू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धात बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमी सारख्या घातक शास्त्राने दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही त कैद झाल आहे. याप्रकरणी आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पि एक सह दहा जणांनी हा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. आमदार बनसोडे यांच्या पीएला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.