पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
ppcnews.in
महिला सक्षमीकरणासाठी केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृती करणारे सक्षम नेतृत्व म्हणून सौ. अनिता संदीप काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत ठाम भूमिका मांडली आहे. “घराणेशाहीला थांबवा, नव्या नेतृत्वाला संधी द्या” या स्पष्ट संदेशासह त्या निवडणूक रिंगणात उतरल्या असून, खऱ्या अर्थाने निर्णय घेणाऱ्या महिलेला साथ देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
घराणेशाहीमुळे राजकारणात मक्तेदारी निर्माण होत असून, सामान्य कार्यकर्ते, महिला आणि नव्या पिढीतील नेतृत्वाला संधी मिळत नाही, अशी भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सौ. अनिता काटे यांची उमेदवारी ही नवीन नेतृत्व, नवीन विचार आणि नवीन विकास यांचे प्रतीक असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.
“नव्या पिढीचे प्रश्न हे नव्या दृष्टिकोनातूनच सोडवावे लागतात,” असे मत व्यक्त करत सौ. अनिता काटे यांनी शिक्षण, आरोग्य, महिला-सुरक्षा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत नागरी सुविधा या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जुनाट आणि केवळ सत्ताकेंद्रित राजकारणाला पूर्णविराम देऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज प्रगती करतो, या विश्वासातून सौ. अनिता काटे यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला आहे. महिला केवळ नावापुरत्या प्रतिनिधी न राहता, स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि जबाबदारीने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी असाव्यात, अशी त्यांची भूमिका आहे.
या निवडणुकीत मतदारांनी घराणेशाहीला नकार देत नव्या, सक्षम आणि विचारशील नेतृत्वाला संधी द्यावी, असे आवाहन करण्यात येत असून, सौ. अनिता संदीप काटे यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील लढत अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















































