ppcnews.in
पिंपळे सौदागर–रहाटणी : प्रतिनिधी
पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप–आरपीआय (आठवले) महायुतीने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. परिसरातील सोसायटीधारकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून महायुतीच्या चारही उमेदवारांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप–आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार शत्रुघ्न काटे, संदेश काटे, अनिता काटे आणि कुंदा भिसे यांचा घराघरांत जाऊन प्रचार सध्या जोरात सुरू आहे. उमेदवार थेट मतदारांच्या भेटी घेत नागरिकांशी संवाद साधत असून, परिसरातील समस्या, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न समजून घेत आहेत.
नागरिकांनी मांडलेल्या अडचणी व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे. या थेट संवादामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी भाजप–आरपीआय महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
यामुळे प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणीमध्ये भाजप–आरपीआय महायुतीच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मतदारांकडून व्यक्त होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.





















































