पिपीसी न्यूज प्रतिनिधी
सांगवी–नवी सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी–नवी सांगवी) मधून अपक्ष उमेदवार म्हणून दिलीप तनपुरे सर यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे. ‘आपला माणूस – हक्काचा माणूस’ या ब्रीदवाक्याने ते मतदारांशी थेट संवाद साधत असून, विकासाभिमुख आणि नागरिक-केंद्रित जाहीरनामा त्यांनी सादर केला आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले, शिक्षणाने M.Com, G.D.C.A. असून सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले दिलीप तनपुरे हे सध्या सक्सेस ग्रुप सांगवीचे अध्यक्ष आहेत.

नागरिकांच्यासुख-दुःखात सहभागी होणारा, सतत संपर्कात असणारा आणि कामातून विश्वास निर्माण करणारा नगरसेवक कसा असावा, याचे प्रत्यक्ष उदाहरण देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
नागरिकांसाठी सादर केलेल्या विकास आराखड्यात २४x७ स्वच्छ पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, स्वच्छता, महिला-सुरक्षा, युवक-युवतींसाठी प्रशिक्षण व स्वयंरोजगार, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, हरित विकास, सौरऊर्जा प्रकल्प, आरोग्यसेवा बळकटीकरण, कचरा व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. तसेच नदी सुधार प्रकल्पांतर्गत पर्यावरण संरक्षण, भाजी मंडईतील समस्या, अतिक्रमणमुक्त रस्ते आणि नागरी सुविधा सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
“निवडून आल्यानंतर प्रभागातील कोणताही विकासाचा निर्णय नागरिकांच्या सहभागाशिवाय होणार नाही,” असा स्पष्ट शब्द दिलीप तनपुरे यांनी दिला आहे. प्रत्येक निर्णयात पारदर्शकता आणि लोकसहभाग हेच त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य असेल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रभागातील नागरिकांकडून त्यांना वाढता पाठिंबा मिळत असून, ‘कप-बशी’ या निवडणूक चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार मतदार व्यक्त करत आहेत.
एकूणच, “माझ्या जनतेला एकच वचन – तुमचा सहभाग हाच प्रभागाचा विकास” या भूमिकेतून दिलीप तनपुरे यांनी निवडणूक प्रचाराला वेग दिला असून, प्रभाग क्रमांक ३२ मधील लढत चुरशीची होत चालली आहे.





















































